कथा - विनोद
१
खोन्ग्रेसचे बडबड प्रमुख नांताराम शायक रस्त्याने चालले होते.
रस्त्यांत एक गाढव मरून पडलेले त्यांना दिसले.
विरोधकांची टिंगल करायची हुक्की त्यांना आली.
लगेच विरोधी कार्यालयात त्यांनी फोन लावला.
'" रस्त्यात एक गाढव मरून पडलेले आहे. समाजातील घाण काढण्याच्या गोष्टी
तुम्ही करता. उचला ते गाढव ! "
दुर्दैव नांतारामाचे. फोन घेतला धतीश सोंडांनी.
धतीश सोंड म्हणाले, " त्याचे काय आहे नांताराम, तुम्ही आम्हाला
हिंदुत्ववादी म्हणता ना ? आमच्या हिंदू धर्मात असे सांगितले आहे कि,
कोणी मेला कि त्याला हात लावायला आधी त्याच्या नातेवाईकाला बोलवायचे.
किती वाजता येता मग ? "
२
समाजातील प्रतिष्टीत मंडळींच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या.
साहजिकच थट्टा मस्करीला उधाणआले होत्ते .
इतक्यात तेथे एक खोन्ग्रेस पुढाऱ्याचे मुल आले .
ते मुल निवडणुकीला उभे रहाणार होते .
एकजण म्हणाला, ' हा बाळ लहानपणी किती गोजिरवाणा दिसायचा.
आक्शी गाढवाच्या पिलावानी. '
एक मिनिट थांबून दुसरा उत्तरला, ' आता ते पिलू मोठे झालेय. '
३
राजकीय लोक नेहमी एकमेकांवर कुरघोडी करीत असतात.
खोन्ग्रेसने एका अति उत्साही माणसाला, नान्ताराम शायकाला बडबडेपद दिले.
दिसणाऱ्या प्रत्येक माणसावर टीका करण्याचा त्याने चंगच बांधला.
एकदा त्याची गाठ धतीश सोंडाशी पडली.
त्याने ऐकले होते कि स्वयंसेवक धतीश सोंड आपले बूट आपण साफ करतात.
धतीश सोंडाची विकेट घेण्यासाठी तो म्हणाला,
" तुम्ही स्वतःचे बूट साफ करता ? "
क्षणभरहि न थाबता धतीश सोंड म्हणाले,
" मग, तुम्ही दुसऱ्याचे करता ? "
४
परवा कवधुत आमतने गाडी घेतली . गाडी बघितल्यावर अनेकांचे डोळे मोठे झाले . गाडी ऐशोआरामी आहे . आपल्या संघटनेत जीवन जगण्याच्या पद्धतीबद्धल काही संकेत आहेत . आणि विशेषतः जबाबदारी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ते पाळावेत असे बघितले जाते . आपला दर्जा महाग गाडी घेतल्याने किंवा भारत विकास परिषदेत शिरल्याने वाढत नसतो . स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत सांगितले होते, आमचा देश कपड्यांवरून नव्हे ज्ञानावरून माणसाची पारख करतो .
नेहमीप्रमाणे सगळेजण सप्ताह मिलनाला जमले होतो . मिलन संपल्यानंतर साहजिकच गप्पा टप्पा . कवधुत आमतच्या पोटात गुडगुडत होते . ते बाहेर काढण्यासाठी त्याने सर्वाना जवळ बोलविले. मंडळात उभे राहून तो सांगू लागला .
' काल मरे वुभाष सेलिङ्ग्करान तिनय वेंडूलकराक भायरी दिली . आमदार जालो म्हण किते जाले . एस्टीम गाडी घेवप . साधी मारुती बी घे मरे . ' इतक्यात एकाने खुक्क केले .
तोंडावर काही म्हणणे बरे दिसत नाही ना ? नंतर तो सांगत होता . सेन्डूलकराने मारुती घेतली तर सेलिंगकराला स्कूटर चालवावी लागेल, आणि कवधुत काय सायकल घेऊन फिरेल ?
असो ! आता काय ? साधी एस्टीम घेतली म्हणून वेन्दुलकराला भायरी मिळाली, कवधुतला सेलिंगकर काय सालामार्कचे एरंडेल देणार ?
No comments:
Post a Comment