( कवी अज्ञाताची क्षमा मागून )
संघटनेच्या अणुरेणूतून, अविरत वेचुनी तेजाचे कण |
रसगंधाशी समरस न होऊन, अहंगंड फुलवावे ||
सुंदर मी परी अजि शोभेस्तव, स्वहित हेतुक मम बलवैभव |
समष्ठीसाठी नच हे सौष्ठव, हे नित हृदयी धरावे ||
दीप नसे मी राखूया तम, असे जाणुनी होऊनी निर्मम |
कणकण देऊनी मिळवता क्षणक्षण, कुटुंबही उजळावे ||
रुपरंग व असो गंधही, यातील माझे सर्वची काही |
श्रेयाचा मज हवा लेशही, सत्कारात विरावे ||
No comments:
Post a Comment