Sunday, 2 February 2025

विनोद

                                                                                  विनोद 


बागेमध्ये असतात,
गुलाबांच्या कळ्या
गणपतरावांचे दात
म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या

Saturday, 1 February 2025

कथा - विनोद

                                                                            कथा - विनोद 

खोन्ग्रेसचे  बडबड प्रमुख नांताराम शायक रस्त्याने चालले होते.
रस्त्यांत एक गाढव मरून पडलेले त्यांना दिसले.
विरोधकांची टिंगल करायची हुक्की त्यांना आली.
लगेच विरोधी कार्यालयात त्यांनी फोन लावला.

'" रस्त्यात एक गाढव मरून पडलेले आहे. समाजातील घाण काढण्याच्या गोष्टी
तुम्ही करता. उचला ते गाढव ! "

दुर्दैव नांतारामाचे. फोन घेतला धतीश सोंडांनी.
धतीश सोंड म्हणाले, "  त्याचे काय आहे नांताराम,  तुम्ही आम्हाला
हिंदुत्ववादी म्हणता ना ?  आमच्या हिंदू धर्मात असे  सांगितले आहे कि,
कोणी मेला कि त्याला हात लावायला आधी त्याच्या नातेवाईकाला बोलवायचे.
किती वाजता येता मग ? "


२ 

समाजातील प्रतिष्टीत मंडळींच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या.
साहजिकच थट्टा मस्करीला उधाणआले होत्ते .
इतक्यात तेथे एक खोन्ग्रेस पुढाऱ्याचे मुल आले .
ते मुल निवडणुकीला उभे रहाणार होते .

एकजण म्हणाला, '  हा बाळ लहानपणी किती गोजिरवाणा दिसायचा.
आक्शी गाढवाच्या पिलावानी. '

एक मिनिट थांबून दुसरा उत्तरला, ' आता ते पिलू मोठे झालेय. '


३ 

राजकीय लोक नेहमी एकमेकांवर कुरघोडी करीत असतात.

खोन्ग्रेसने एका अति उत्साही माणसाला, नान्ताराम शायकाला  बडबडेपद दिले.
दिसणाऱ्या प्रत्येक माणसावर टीका करण्याचा त्याने चंगच बांधला.

एकदा त्याची गाठ धतीश सोंडाशी पडली.
त्याने ऐकले होते कि स्वयंसेवक धतीश सोंड आपले बूट आपण साफ करतात.

 धतीश सोंडाची विकेट घेण्यासाठी तो म्हणाला,
" तुम्ही स्वतःचे बूट साफ करता ? "

क्षणभरहि न थाबता धतीश सोंड म्हणाले,
" मग, तुम्ही दुसऱ्याचे करता  ? "


 परवा कवधुत आमतने गाडी घेतली . गाडी बघितल्यावर अनेकांचे डोळे मोठे झाले . गाडी ऐशोआरामी आहे . आपल्या संघटनेत जीवन जगण्याच्या पद्धतीबद्धल काही संकेत आहेत . आणि विशेषतः जबाबदारी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी ते पाळावेत असे बघितले जाते . आपला दर्जा महाग गाडी घेतल्याने किंवा भारत विकास परिषदेत शिरल्याने वाढत नसतो . स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत सांगितले होते, आमचा देश कपड्यांवरून नव्हे ज्ञानावरून माणसाची पारख करतो .    

     नेहमीप्रमाणे सगळेजण सप्ताह मिलनाला जमले होतो . मिलन संपल्यानंतर साहजिकच गप्पा टप्पा . कवधुत आमतच्या पोटात गुडगुडत होते . ते बाहेर काढण्यासाठी त्याने सर्वाना जवळ बोलविले. मंडळात उभे राहून तो सांगू लागला . 
     ' काल मरे वुभाष सेलिङ्ग्करान तिनय वेंडूलकराक भायरी दिली . आमदार जालो म्हण किते जाले . एस्टीम गाडी घेवप . साधी मारुती बी घे मरे . ' इतक्यात एकाने खुक्क केले . 
    तोंडावर काही म्हणणे बरे दिसत नाही ना ? नंतर तो सांगत होता . सेन्डूलकराने मारुती घेतली तर सेलिंगकराला स्कूटर चालवावी लागेल, आणि कवधुत काय सायकल घेऊन फिरेल ? 
     असो ! आता काय ? साधी एस्टीम घेतली म्हणून वेन्दुलकराला भायरी मिळाली,  कवधुतला सेलिंगकर काय सालामार्कचे एरंडेल देणार ?  


Sunday, 11 August 2013

गीत २ घाल घाल पिंगा वार्‍या माझिया फ्लेटात

विडंबन :- ' घाल घाल पिंगा वार्‍या. . . .  ' या कवितेचे 


                 कवी : - कृ. ब. निकुंब... यांची क्षमा मागून 



घाल घाल पिंगा वार्‍या माझिया फ्लेटात 
सासरी जा सुवासाची कर बरसात !

"सुखी आहे पोर"- सांग सासूच्या कानात
"आई, बाबासाठी परि मन खंतावतं !



विसरली का ग भादव्यात वर्स झालं,

सासरच्या सुखाला ग मन आचवलं.

फिरुन-फिरुन सय येई जीव वेडावतो
सलवारचा ग शेव ओलाचिंब होतो.

काळ्या कॅपीचा ग डॉगी खोडकर फार,
हगुहगुनिया करी कसा ग बेजार !

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं चोरायला येशील तू गडे ?

डेअरीच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !"

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
सासुच्या त्या भेटीसाठी जीव व्याकूळला !



Friday, 9 March 2012

विडंबन श्लोक

                                              विडंबन श्लोक 

मतदानापूर्वी देवा
तूच माझा मायबाप !
मतदानानंतर आता
तुझ्या बापाचा मी बाप !!

२ 
हाय कम्बख्त , तेरे होटों पे ,  अदाओं पे
नाचीज बिला मरता है !
लेकिन ये  देश बिला का नहीं
बिले ( विवेकानंद ) का है।
थोड़ेही दिन ठहर जा यारों
हिन्दुस्थान , कश्मीरसह पाकिस्थान ले लेता है।  

वीस वर्सा हातात बडी
बाबडे शेतुकय ना गरवता ।
आयज आमदार पुण विरोधी
म्हूण  मेरेर बसून परवता ।।

निवडणूक यंदा आहे
माझा रुपाया बंदा आहे !
निवडून आलो कि चंदा आहे
नाही तर सगळा वांधा आहे !!

मतदार राजा मला पावशिल का ?
राजसुख म्हणत्यात ते दावशील  का ?

इलेक्शनच्या बाजारात
पत म्हजी मोठी !
रांड म्हणा पोट वाढा
दिया  लाख कोटी !!

आपला पक्ष, आपला पक्ष
उगाच आपण म्हणायचे !
कुंपणावरच्यांना तिकीट मिळताच
आतल्या आत जळायचे !!

आम्हाला लुटले या  
मंत्री भ्रष्टाचार्यांनी !
गोऱ्या गोऱ्या कपड्यांनी,
 काळ्या काळ्या पैश्यानी !!

मनोहरभाई, दिगंबरबाब
एक तरी डाव द्या !
आपल्याच पक्षात पावन करून
स्वप्नांना गाव द्या !

१०
इथे प्रत्येकजण पक्षांतराच्या उंबरठ्यावर
आणि दार सताड उघडे आहे
तरी पक्षनिष्ठेवर बोलणे
हा प्रत्येकाचा छंद आहे

११
समरसतेवरचे बौद्धिक 
परिसंवादातच राहिलं
आमदारकीसाठी जातीनं 
डोके वर काढलं 

१२
मतदानाआधी उमेदवार लावतील 
आश्वासनांची शेंडी !
निवडून आल्यावर तेच नागरिक 
बापडी शेळी आणि मेंढी !

१३
यादी जाहीर नाही तोवर वाटते 
पक्षात आपली किती वट !
मग करतील थयथयाट
जेव्हा पत्ता होईल कट !

१४
मतदारसंघ थोडे, 
उमेदवार फार !

१५
उथळ प्रसिद्धीत 
जाहिराती फार !

१६
पर्वरीम एव जाय ते , 
आमुचे ब्रीदवाक्य  आहे !
बीजेपी कोन्ग्रेस राको मगो , 
हाची मंत्र जपताहे !!

१७
गोयचे नाव घाण करूंक |
सान जाले ल्हान ||
स्विस बैन्को देवळां तांची | 
खुर्ची  हान्चो प्राण ||

१८
सत्ता, सिंहासनाची  
कधी सुटत नाही हाव
खासदारकी सोडून 
मुख्यमंत्रीपदी धाव 

१९
ने मजसी ने, 
परत खुर्ची मज प्यारा !
मतदारा, प्राण तळमळला, 
तळमळला मतदारा !!

२०
अण्णांनी लोकपालाचो चेंडू 
ढोंगी नेत्यांचेर  मोकलो  |
सगळ्या खासदारांची मळमळ
 एकलोच लालू ओकलो ||

२१
देशाचा असली  गांधी आज 
जनतेसोबत उपाशी |
इफ्तार पार्टीत नकली प्रधान 
खातात तुपाशी ||

२२
धनदांडगा  पट उघडा , 
नाचे  बापुडी पेदी !
कोन्ग्रेस असो असो भाजपा , 
महाजन वा येदी !

२३
पथ का अंतिम लक्ष्य  यही है,
सिंहासन चढते जाना !
सब समाज को पीछे छोडके,
स्वयम ही सत्ता पद पाना  !!

२४
अरे सरकार सरकार  , 
रुप्या वर्ख खव्यावर !
दोन्ही हातांनी मलई , 
खाती मंत्री हे लाचार !

२५
दिगम्बराच्या काटशहात, 
मुसराद्ची खोलली  पोल |
बाण गेला, नावेली जाईल, 
चर्चीलचा स्वतःवरच सेल्फगोल ||

२६
माझ्या गोव्याच्या भूमिला | 
मीना खाणींचा रे फास ||
लोकां अपघाती मृत्यू | 
नेत्या हप्त्यांचा रे ध्यास ||

Sunday, 18 September 2011

गीत १ विकसित व्हावे, स्वार्थी होऊनी जावे

( कवी अज्ञाताची क्षमा मागून )

विकसित व्हावे, स्वार्थी होऊनी जावे ||

संघटनेच्या अणुरेणूतून, अविरत वेचुनी तेजाचे कण |
रसगंधाशी समरस न होऊन, अहंगंड  फुलवावे ||

सुंदर मी परी अजि शोभेस्तव,  स्वहित हेतुक मम बलवैभव |
समष्ठीसाठी नच हे सौष्ठव, हे नित हृदयी धरावे ||

दीप नसे  मी राखूया  तम, असे जाणुनी होऊनी निर्मम |
कणकण देऊनी मिळवता क्षणक्षण, कुटुंबही उजळावे ||

रुपरंग व असो गंधही, यातील माझे सर्वची काही |
श्रेयाचा मज हवा लेशही, सत्कारात विरावे ||